पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'सर्वांना कोरोनाच्या संकटाबद्दल पूर्ण कल्पना आली आहे. युद्धात आपला शत्रू नकळत वार करत असतो. तसंच हा शत्रू न दिसणारा आहे. तो कुठून हल्ला करेल हे माहिती नाही.  घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत करोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारु, असे सांगितले.

कोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद

पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे काल रात्री सगळीकडे गोंधळाची परिस्थिती होती. मात्र घाबरुन जाऊ नका. आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसासाठा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं सुरु आहेत. भाजीपाल्यांची दुकानं सुद्धा बंद होणार नाहीत त्यामुळे झुंबड करु नका. भाजीपाला तसंच जीवनावश्यक वस्तू आणायला जाताना एकट्याने घराबाहेर पडा, असे देखील त्यांनी सांगितले.

कोरोनाशी लढा : विनाकारण मलेरियारोधक औषध घेऊ नका, केंद्र सरकार

दरम्यान, तळहातावर पोट असणाऱ्यांसाठी मी कंपन्यांशी संपर्क करत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनी आणि कारखाने बंद ठेवले आहेत. या कंपनी मालकांनी तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांचे किमान वेतन थांबवू नका. त्यांना किमान वेतन द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कंपनी मालकांना केले आहे. कोरोनाचे संकट थांबेल पण कामगारांना वेतन न मिळाल्यामुळे पुन्हा मोठं संकट उभे राहिल, असे देखील त्यांनी सांगितले.