पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सांगली कृष्णा नदी

पुण्यासह सांगली जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दोन दिवसांपासून कडेगाव, पलूस, खानापूर येथे अतिवृष्टी झाली. या पावसामुळे आणि कोयना धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णानदीकाठी असलेल्या औदुंबरमधील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे.

तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळ; छगन भुजबळांचा टोला 

कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आणि कोयना धरणातून सूरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीची पाणी पातळी आयर्विन पुलाजवळ २५ फुटांवर पोहचली आहे. एका दिवसामध्ये १० फुटाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी

कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील झपाट्याने होणारी वाढ आणि कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे. कृष्णा नदीकाठच्या औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. 

पुण्यात पावसाने घेतला १२ जणांचा बळी; चौघे बेपत्ता