पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठी सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पावसाचे संकेत

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आणि बुधवारी पावसाचा जोर असल्यामुळे परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. कोयना, राधानगरी या महत्त्वाच्या धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

पंचगंगा नदीची पाणी पातळी कोल्हापूरजवळ ३५ फुटांवर जाऊन पोहोचली आहे. तर सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांतील रहिवाशांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून होणारा विसर्ग सुरूच राहिल. त्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातूनही बुधवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी पावसाचा जोर कायम होता.

...आता एका रिक्षाचालकाला ठोठावला ४७,५०० रुपयांचा दंड!

गेल्याच महिन्यात सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. अनेक गावांतील घरे पाण्याखाली गेली होती. लष्कर, एनडीआरएफ यांना पाचारण करून बोटीतून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर लोकांमध्ये सध्या काहीसे काळजीचे चित्र आहे. अद्याप महापुराचा तडाखा बसलेल्या सर्व नागरिकांचे जनजीवन सुरळीत झालेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:water level of krishna and panchaganga river increased due to heavy rains sangli kolhapur satara