पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ, लगतच्या गावात दक्षतेचा इशारा

प्रातिनिधिक छायाचित्र

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः कोल्हापूरमधील पंचगंगा आणि सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने लगतच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहते आहे. त्यातच राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. कोल्हापूरमध्ये बुधवारीही पाऊस सुरूच राहिल्यास पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर शहराच्या काही भागात शिरू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या भागात पुराचे पाणी शिरते, तेथील रहिवाशांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येऊ शकते. 

साताऱ्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत असल्याने या ठिकाणीही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जामवाडी परिसर, मगरमच्छ कॉलनी या भागात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलिवण्यात येणार आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीचे पाणी सध्या ३५ फूटांपर्यंत पोहोचले आहे. अद्याप कोयना धरणातून विसर्ग सुरू झालेला नाही. तरीही पाण्याची पातळी धोकादायक रेषेपर्यंत पोहोचली आहे.