पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावः यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून छापल्या १००च्या नोटा

यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून छापल्या १००च्या नोटा (प्रतिकात्मक छायाचित्र)

नोटांचे कलर झेरॉक्स काढून चलनात आणणाऱ्या दोघांना जळगाव येथून पोलिसांनी अटक केली आहे. अमजदखान अफजलखान (२२, रा., तांबापुरा), शेख रईस शेख रशीद (२५, रा. मच्छी बाजार, तांबापुरा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कलर झेरॉक्स मशीनच्या मदतीने बनावट नोटा तयार करण्याचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहून जळगावमधील तांबापुरात राहणाऱ्या या दोघा संशयितांना झटपट श्रीमंत होण्याची लालसा झाली. त्यांनी झेरॉक्स मशीन खरेदी करून महिनाभरापासून घरातच नकली नोटा बनवण्याचा धंदा सुरू केला होता. या दोघांनी बनावट नोटा चलनात आणल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला समजले. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या दोघांकडून ७४ हजार ३०० रुपये किमतीच्या १०० रुपयांच्या ७४३ नोटांसह झेरॉक्स मशीन जप्त करण्यात आले आहे. 

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

या दोघांनी शेकडो नोटा तयार केल्या. यातील अनेक नोटा सध्या चलनातही आहेत. या नोटा चलनात आणण्यासाठी त्यांना अडचणी होत्या. यासाठी रईसने एका नातेवाईकास माहिती देऊन खेड्यांत या नोटा चलनात आणण्याची विनंती केली. त्यानुसार काही नोटा चालवण्याचा प्रयत्न झाला आणि ही माहिती लीक झाली.

पुणेः बनावट नोटांचा भरणा करून युनियन बँकेची फसवणूक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Watching video on you tube printed 100 rupees duplicate note two arrested in jalgaon tambapura