पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात अटक वॉरंट

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

 

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगीतुरा

२ जानेवारी २०१८ रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक    आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपचारासंदर्भात झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घातला होता. 

आनंद शिंदेंचा राजकारणात प्रवेश; सोलापूरात केली घोषणा

यावेळी बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या तारखेला आमदार प्रणिती शिंदे हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याक आले आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.