वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं मोदींना पत्र लिहिणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. देशातील स्थिती, काश्मीर प्रश्नावर या विद्यार्थ्यांनी मोदींना पत्र लिहून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारवाई करत सहा विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असं स्पष्टीकरण विद्यापीठानं दिलं आहे.
जागतिक चॅम्पियनशीपः मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून पराभव
निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंदन सरोज, नीरज कुमार, राजेश सारथी, रजनीश आंबेडकर, पंकज वेला आणि वैभव पिंपळकर अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी हे स्त्री अध्ययन विभागातील विद्यार्थी आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन तसेच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे.
विद्यापीठ परिसरात बसपाचे संस्थापक कांशीराम यांची जयंती साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. परंतु, विद्यापीठाने ती नाकारली. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. त्यानंतर देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामूहिक पत्र लिहिण्याचं ठरवलं होतं. विद्यापीठानं सामूहिकपणे पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापासून विद्यार्थ्यांना मज्जाव केला.
सलग १२ व्या वर्षी मुकेश अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत
त्यानंतर विद्यापीठानं विद्यार्थ्यांवर आचार संहितेचे उल्लघंन आणि न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारवाई करत निलंबन केले.