पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाड्यामध्ये २० लाखांचा बेकायदेशीर सॅनिटायझरचा साठा जप्त

सॅनिटायझरचा साठा पोलिसांनी जप्त केला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सॅनिटाझरची मागणी खूप वाढली आहे. अशामध्ये अनेक कंपन्या बेकायदा सॅनिटायझरचा साठा करुन ठेवत आहेत. अशा कंपनीवर पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. वाडा एमआयडीसीतील एका कंपनीवर छापा टाकत पोलिसांनी २० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे. 

'हनुमानासारखा पर्वत उचलायचा नाही, घरी थांबूनच जयंती साजरी करा'

मिळालेल्या माहितीनुसार, वाडा एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये बेकायदा सॅनिटायझरचा साठा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाडा पोलिसांनी एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीवर छापा टाकला. याठिकाणी असलेले सॅनिटायझर आणि सॅनिटायझर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. जवळपास २० लाखांचा सॅनिटायझरचा साठा पोलिसांनी जप्त केला. 

लॉकडाऊनः एमपीएससीची परीक्षा पुन्हा स्थगित

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवानगी शिवायच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर एफडीएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मास्क आणि सॅनिटायझरचा बेकायदा साठा करुन ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. 

लॉकडाऊन : इरफानचा मुस्लिम बांधवांना खास संदेश Video

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:wada police have raided a chemical company and seized hand sanitizer valued around 20 lakhs