पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय तृतीयानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोगरा फुलांची आरास

अक्षय तृतीया निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विठुरायाच्या आणि रूक्मिणी मातेच्या मंदिरात मोगर

अक्षय तृतीया निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विठुरायाच्या आणि रूक्मिणी मातेच्या मंदिरात मोगरा फुलांची आरास करण्यात आली. साडेतीन मुर्हतांपैकी अक्षय तृतीया एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. यादिवसापासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात येतात आणि श्रीच्या महानैवेद्यात आमरस देण्यात येतो.

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या मंदिरातील आरास मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेनंतर पावसाळा जवळ आला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी नांगरलेल्या शेत जमिनीची मशागत करण्याचे काम या दिवशी पूर्ण करण्यात येते. या दिवसापासून बियाणे पेरण्याची सुरूवात केली जाते. या दिवशी असंख्य लोक सोने खरेदी किंवा नवीन व्यवसाय ही सुरू करतात. परंतु, सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्व काही बंद आहे. 

३ मे नंतरही लॉकडाऊन?, अनेक राज्ये कालावधी वाढण्यास तयार

मंदिर समितीचे माळी सुभाष देवमारे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली १५० किलो मोगऱ्याची फुले सेवा म्हणून दिलेली आहेत. त्यातून फक्त देवाभोवती ती गुंफलेली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.