पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणारः CM ठाकरे

उद्धव ठाकरे

पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासनेसाठी राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

लोकनेते राजारामबापू यांचे ३६ वे पुण्यस्मरण व जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूधसंघाच्यावतीने २४ कोटी ४० लाख रूपये खर्चून उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

मी बेळगावला येतोय, पाहू काय घडतंयः संजय राऊत

पशुधनाची जोपासना करणे सर्वार्थाने महत्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देवून ठाकरे म्हणाले, फिरत्या पशु चिकित्सालय उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर राज्यात विभागनिहाय पशु चिकित्सालये सुरु करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी जे - जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी आपलं सरकार वचनबध्द राहील, अशी ग्वाही देवून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हे सरकार कोणताही सूड उगवणारे नसून, जे चांगले आहे, ते टिकवणं, वाढवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारभार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कर्नाटक पोलिसांची मुजोरी; मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना ताब्यात घेऊन सुटका

राज्यातील शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला.

राज्यातील सहकार क्षेत्र अजिबात मरु देणार नाही, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून काम केले पाहिजे, असे अभिवचन मी सहकारात काम करणाऱ्यांकडून मागतो आहे. हे निश्चितपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.