शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी जनादेशाचा अपमान केला आहे. यापुढील काळात त्यांना उघडे पाडले जाईल. लवकरच ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी जाहीर केले. नवी मुंबई येथे भाजपचे राज्य अधिवेशन होणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद आयोजित करुन तावडे यांनी अधिवेशनाची रुपरेषा प्रसार माध्यमांना सांगितली.
ज्योतिरादित्य शिंदे-कमलनाथ यांच्यातील वाद सोनिया गांधींच्या दारी
ते म्हणाले, भाजप प्रखर विरोधक म्हणून काम करणार आहे. गेल्या ८० दिवसांत सरकारकडून जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. जनतेसमोर हे सर्व आणले जाईल.
Maharashtra: BJP president JP Nadda to hold a meeting with members of State Executive Committee of the party, in Mumbai tomorrow. pic.twitter.com/P7zjgW256w
— ANI (@ANI) February 15, 2020
भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल देऊ नका, तुर्कीला ठणकावले
रविवारी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे मार्गदर्शन करणार असून रविवारी काही प्रमुख प्रस्ताव मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनात आगामी संघर्षाची दिशा ठरणार आहे. नागरिकत्व कायदा, राम मंदिर आणि कलम ३७० हटवल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही या अधिवेशनात बोलणार आहेत. या अधिवेशनाला सुमारे १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.