पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत नववर्षाच्या पहाटे गाड्यांची तोडफोड करत जाळल्या

सांगलीत गाड्यांची तोडफोड करत जाळल्या

सांगलीमध्ये नवीन वर्षाच्या पहाटे गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली शहरातील १०० फुटी रोडवर ही घटना घडली आहे. १५ ते २० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर दोन कार पेटवून देण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे सांगली शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली पोलिसांनी दोन जणांचा ताब्यात घेतले आहे.

पदभार स्वीकारताच रावत म्हणाले, आम्ही राजकारणापासून दूरच 

सांगली शहरतील १०० फुटी रोडवर पार्क असलेल्या गाड्यांची तोडफोड करत त्या जाळण्यात आल्या आहेत. मध्यरात्री अडीच्या सुमारस ही घटना घडली आहे. ४ ते ५ जणांनी १५ ते २० गाड्यांची तोडफोड करत स्कार्पिओ आणि मारुती कार अशा दोन गाड्या जाळल्या. यामध्ये दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर तोडफोड केलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी याच रस्त्यावरुन जात होते. त्यांनी ही घटना पाहिली असता हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. 

अयोध्येत मशिदीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त सरकारने

दरम्यान, आशिष कोरी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील घटनास्थळी धाव घेत आग विझवली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फूटेज तपासले. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन जणांचा शोध सुरु आहे. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

काश्मिरात नौशेरामध्ये सर्च ऑपरेशनवेळी गोळीबारात दोन जवान