पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे असेल, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला पक्ष असून त्या पक्षात भविष्य नसल्यामुळेच त्यांचे नेते भाजपत येत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित, त्यात पश्चिम महाराष्ट्रापुरता, परत त्यातील एक जिल्ह्यापुरता हा मर्यादित पक्ष आहे. भविष्यातील नेतृत्व मोदींकडे असावे असे त्यांना वाटते म्हणूनच त्यांचे नेते भाजपत येत आहेत. वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे पक्षच आता बी टीम झाली असून 'वंचित' आता ए टीम झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर 'वंचित'चा विरोधी पक्षनेता असेल, असे भाकीतही केले.

नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदी बाहेरचाः चंद्रकांत पाटील

नांदेड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाजनादेश यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात आहे.फडणवीस पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या यात्रांना कुठेच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सत्तेत असताना त्यांनी लोकांसाठी काम केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. शरद पवार हे एका पत्रकारावर भडकले होते. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर मी भाष्य करणे हे योग्य नाही. शेवटी काळाची पावले ओळखली पाहिजेत. लोकांना मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. लोकांना वाटते की भविष्यातील नेतृत्व मोदींकडे असावे. त्यामुळे ते भाजपत येत आहेत.

प्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगीतुरा

आर्थिक मंदीविषयी ते म्हणाले की, जगामध्ये आर्थिक मंदी आहे. आता त्याचा थोडा फटका आपल्याला बसतोय. पण केंद्र सरकार जागे आहे. त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहेत. त्यामुळे जीडीपीचा दर आपण सुधारु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'पुढची २५ वर्षें या देशात भाजपचीच सत्ता असणार'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vanchit bahujan aghadhi would possible to get opposition leader post says cm devendra fadnavis