पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Bandh: औरंगाबाद, सोलापूरमध्ये बसवर दगडफेक

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप खासदार रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली आहे.

औरंगाबाद आणि हिंगोलीमध्ये महाराष्ट्र बंदला हिंसक वळण आले आहे. औरंगाबादमध्ये सिटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण आले आहे. सोलापूर शहरातील सीटीबसवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक करुन हल्लोखोर फरार झाले आहे. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 

हिंगोलीमध्ये महाराष्ट्र बंद दरम्यान, घोषणाबाजी देणाऱ्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

अमरावतीमध्ये महाराष्ट्र बंदला हिंसक वळण आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इर्विन चौकामध्ये दुकानावर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनआरपी आणि भारत सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीविरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये समिश्र प्रतिसाद मिळत आहे.