पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक

प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि खासगीकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. वंचित बहुजन  आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. राज्यातील सुमारे ५० हून  अधिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे.  या बंद दरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मी रंग बदलू नाही! राज ठाकरेंचा बंधू CM यांना टोला

महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना आणि कामगारांच्या वतीनं CAA, NRC, निर्गुंतवणूक धोरणाविरोधात बंद पुकारला आहे.  १६ जानेवारीला सर्व संघटनांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला. या बंदात ऑल इंडिया स्टुंडटस फेडरेशन, लालसेना, राष्ट्रसेवा दल, असंघटित कष्टकरी कामगार संघटना अशा ५० हून अधिक संघटना सामिल होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं म्हटलं आहे. 

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करतानाच, आंबेडकर यांनी देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली.  या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, जनतेनं सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी व्हावा, यासाठी वंचितसह अन्य संघटनांच्या नेत्यांनी जनजागरणासाठी बैठका घेतल्या. बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य  आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच, सरकारी किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

'देशाशी प्रामाणिक असणारे मुस्लिम आमचेच आहेत'