पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बळीराजाला फटका, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस

शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्हा, नाशिकमधील नांदगाव आणि मराठवाड्यातील काही भागात जोराचा अवकाळी पाऊस झाला. उन्हाळ्याची सुरुवातही झाली नाही तोपर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पण, द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये काही ठिकाणी कांदा भिजला आहे. हातातोडांशी आलेले पीक डोळ्यादेखत जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नव्हता. 

तालिबानबरोबर शांतता करार; अमेरिकेने म्हटलं, अफगाणिस्तान सोडणार

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबड, बदनापूर, भोकरदन आणि जालना शहर व औद्योगिक वसाहत परिसरात अवकाळी पावसाने दणका दिला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथे हलक्या गारासह मध्यम स्वरुपाचा पाउस झाला.

शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

बहुतेक ठिकाणी ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांची काढणी सुरू आहे. पिकांची कापणी होऊन पेंढ्या बांधलेल्या स्थितीत रानात विखुरलेल्या स्थितीत आहेत. अशा वेळी जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे.

बिहारमध्ये गंडक नदीत नाव उलटल्याने १३ जण बुडाले

द्राक्ष काढणीला आलेल्या स्थिती असताना हा पाऊस झाल्याने मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, टेंभुर्णी, माढा, कुर्डुवाडी आदी ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला. विजांचा कडकडाटासह पाऊस कोसळला. जोरदार वारा सुटला होता.