मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला, वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे अशी प्रतिक्रिया दिली.#Budget2020
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 1, 2020
देशातील सध्याची अर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नव्या अर्थसंकल्पातील तरतुदी फायदेशीर ठरतील का?
राहुल गांधींच्या त्या प्रश्नावर PM मोदींनी असा दिला रिप्लाय
आयडीबीआय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकणे, रेल्वेचे खासगीकरण करण्याबाबतचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडल्याचे दर्शन घडवतात, अशा शब्दांत ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सरकारी रोखे परदेशी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा काळजी वाढविणारा विषय असल्याचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. २०३० मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होतांना दिसत नाही. पर्यटन क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हा अर्थसंकल्प मुठभर भांडवलदारांसाठीच: मायावती
देशातील पाच हिस्टॉरिकल स्थळांचा 'आयकॉनिक साईट' म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे, त्यात सांस्कृतिक दृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही साईटचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप ठाकरे केंद्र सरकारवर केला आहे.