अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्थसंल्पात कोणतीही नवी तरतूद दिसत नसल्याचे म्हटले आहे. केंद्राने मुंबई आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा उल्लेख करत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प
शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले, 2014 ला त्यांनी हेच सांगितले होते. प्रत्यक्षात दुप्पट उत्पन्नाचे ध्येय गाठायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर 11% पाहिजे, आज तो अवघा 2% आहे. त्यामुळे ही घोषणा देखील फसवी: ना. बाळासाहेब थोरात #Budget2020 pic.twitter.com/l6l7ba9PgP
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 1, 2020
बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, केंद्राला मिळणाऱ्या कर उत्पन्नात मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पण या अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद दिसत नाही. नवी बाटली अन् जूनी दारु अशा शब्दांत त्यांनी अर्थसंकल्प निराशा करणारा असल्याचे म्हटले आहे.
Union Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थसंकल्पातील तरतूदीवरुन थोरातांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. २०१४ मध्ये हीच घोषणा करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्केपर्यंत न्यावा लागले. सध्याच्या घडीला तो केवळ २ टक्के इतका आहे. त्यामुळे ही घोषणा देखील फसवी, असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.