पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पावरुन विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत असताना भाजप नेत्यांकडून अर्थसंकल्पातील तरतूदींचे स्वागत करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अर्थसंकल्पाचे स्वागत करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे देखील त्यांनी अभिनंदनही केले.

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुळापासून उपचाराचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि कृषी विकासातील अडथळे दूर करण्यासाठी उत्पादन, कृषी मालाची वाहतूक, बाजारपेठ, निर्यात अशा सर्वच बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. किसान रेल आणि  कृषी उडान यासारखे निर्णय ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. शेतकरी कल्याणासाठी सुधारणावादी कायदे स्वीकारणाऱ्या राज्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा मनोदय या  नवदशकातील अर्थसंकल्पातून स्पष्टपणे अधोरेखित होतो. सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद हा ग्रामोदयाचा मार्ग अधिक सुकर आणि गतिमान करणारा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Budget 2020 : काय स्वस्त, काय महाग?

'अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा अर्थसंकल्प'

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा करदात्यांना दिलासा देणारा, शेतकऱ्यांच्या विकासाची शाश्वती आणि रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करुन देणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. कररचनेतील नवीन बदलाचा लाभ कोट्यवधी करदात्यांना मिळणार आहे. शेतक-यांच्या विकासाच्या नवीन सुविधा व योजना सुरु करण्यात येणार असल्यामुळे त्याचा खरा फायदा बळीराजाला मिळणार आहे. 

Union Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

अर्थसंकल्पात कृषी, सिंचन व ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी १६ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या १६ कलमी कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, एक वस्तू, एक जिल्हा, जैविक शेती, झीरो बजेट या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महिला विकासावर भर देण्यात आला आहे. या सर्वसमावेशक घटनाकांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.