पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कसारा घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह, १० दिवसांपूर्वी खून झाल्याची शक्यता

महाराष्ट्रात एका महिलेचा खून

कसारा घाटामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, ती ५० वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. साधारणपणे दहा दिवसांपूर्वी तिचा खून झालेला असण्याचा अंदाज आहे.

कसारा घाटातून जाणाऱ्या काही प्रवाशांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे रविवारी केली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांना एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे आढळले. हा बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये महिलेचा मृतदेह होता. मृत महिलेच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे तिच्यावर वार करून तिचा खून केला असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पोलिसांनी संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूरमधील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. दहा दिवसांपूर्वी तिचा खून करून मृतदेह घाटात ढकलून दिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.