पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'घाबरु नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी, नुकसान भरपाई लवकर मिळेल'

उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर

राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणूक होऊन तीन आठवडे झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत कोणाकडे मागावी असा प्रश्न पडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. थेट शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम देखील उपस्थित होते. 

चिदंबरम यांना पुन्हा झटका, जामीन अर्ज फेटाळला

शिवसेना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. नुकसान भरपाई लवकर मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. जिल्ह्यातील आटपाडी आणि कडेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी त्यांनी केली. विटा, नेवरी येथील टोमॅटो, द्राक्ष आणि डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे त्याची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. 

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'

या पाहणी दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्यावतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट दिली. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या इतर अडचणी जाणून घेऊन. त्या माझ्याकडे लेखी स्वरूपात पाठवा अशा सूचना त्यांनी मदत केंद्र प्रमुखांना दिल्या. तसंच, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

मगरीच्या जबड्यातून बहिणीला सोडवणाऱ्या भावाची चित्तथरारक