पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देश संकटात आहे, मोदी-शहांना जे हवंय तेच घडतंय, शिवसेनेचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिल्लीतील जेएनयू येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतके निर्घृण राजकारण कधी कोणी केले नव्हते. जेएनयूतील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे. देश संकटात आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. 

JNU हिंसाचारः गेट वे ऑफ इंडिया येथून आंदोलकांची आझाद मैदानावर रवानगी

काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन लोकांची दिशाभूल करुन हिंसाचार भडकवल्याचा आरोप अमित शहा करत आहेत. अमित शहांनी पुराव्यासह जबाबदारीने आरोप केला असेल तर गांधींवर कारवाई व्हायला हवी, त्यांना अटकेपासून कोणीही रोखलेले नाही. उलट सरकारच्या कायद्याविरोधात जनमत तयार करण्याची व लोकांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यात असल्याचे एकप्रकारे शहांनी मान्य केल्याचे शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रात म्हटले आहे.

JNU हिंसाचार : NCP चे युवा आमदार रोहित पवारांनी विचारले संतप्त

काय म्हटलंय शिवसेनेनं..

झाकलेल्या अज्ञात हल्लेखोर टोळीने ‘जेएनयू’मध्ये हिंसाचार केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपप्रणीत अभाविप आणि ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचे हे चित्र आहे. चेहरे झाकून एक टोळके आत घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला. त्यात शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणे ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. २६/११ चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच चित्र दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे.

जेएनयू हिंसाचार: कुलुगुरुंना हटवण्याची मागणी

गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीतच आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी सरकारी पत्रके वाटण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गृहमंत्र्यांवर ही काय वेळ आली आहे? नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली. 

JNU हिंसाचार: अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा ढासळते : इरफान पठाण

अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले हे हास्यास्पद आहे. देशात अराजकता निर्माण करणारे हे राजकारण धोकादायक आहे. अशाने देशाचे तुकडे पडतील, समाजास तडे जातील. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतके निर्घृण राजकारण कधी कोणी केले नव्हते.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी