पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जामिया'मध्ये जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

जामिया विद्यापीठात जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या देशात तरुण बिथरतो तो देश कधीच स्थिर राहू शकत नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तरुणांना बिथरवू नका तेच आपल्या देशाच्या भविष्याचा आधार आहे. केंद्रानं तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नये, असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी पुढे असे सांगितले की,  सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला मी नम्र आवाहन करतो की विधीमंडळाच्या परंपरेला काळीमा फासली जाईल असे काम कोणीही करुन नका. तुमचे प्रश्न मांडा आमच्याकडून उत्तरे दिली जातील. आमदारांनी सभागृहात समस्या ठेवणे अपेक्षित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील

सामनाच्या अग्रलेखाची पोस्टर्स झळकावणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 'आम्ही सामना बघत नाही, आम्ही सामना वाचत नाही, अशा लोकांना सामना हातात घेऊन दाखवावा लागला. सामना वाचला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच, चोरुन सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर त्यांना कळाले असते, असे देखील त्यांनी सांगितले. 

देशद्रोहाच्या खटल्यात पाकिस्तानात परवेझ मुशर्रफ यांना फाशीची

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणार आहे. शेतकऱ्यांसाठी मी स्वत: रस्त्यावर उतरलो आहे. लोकांना माहिती आहे की आम्ही दिलेले वचन पाळणारे आहोत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, इथे  शेतकऱ्यांसाठी गळा काढणाऱ्यांनी केंद्रात जाऊन गळा मोकळा करावा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच, जर शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा. राज्य सरकारच्या नावाने करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

Paytm च्या माध्यमातून २४ तास NEFT सेवा, अशी सेवा देणारे पहिले अ‍ॅप