पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅक्सिस बँकच्या प्रश्नावर CM म्हणाले, मला सगळ्या खात्याचं एक्सेस

उद्धव ठाकरे

राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदारांची नाराजी, शेतकरी कर्जमाफी आणि खातेवाटपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. एका पत्रकाराने त्यांना अ‍ॅक्सिस बँकतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन खात्यासंदर्भात चर्चेत असलेल्या मुद्यासंदर्भात विचारणा केल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिउत्तर देताना सर्व खात्यांचे एक्सेस माझ्याकडे आहे, असे उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी दिले.  

भावाला मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज?, शपथविधीला दांडी

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्या बँकेत राज्यातील  पोलिसांची सर्व वेतन खाती राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियात वर्ग करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. यासंदर्भात अमृता फडणीवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. इंग्रजी वृत्तपत्रातील बातमी रिट्विट करत त्यांनी ॲक्सिस बँकचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला होता.  

अजित पवार सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

अ‍ॅक्सिस बँकेच्यासंदर्भातील प्रश्नावर कसलेल्या राजकारण्यासारखे वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांनाच उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी 'वर्षा' बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स आणि यूटी या शब्दांवरुन रंगलेल्या राजकारणावरही भाष्य केले.  महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्यांना काही काम नाही. ते अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. वाद घालणे किंवा भिंती रंगवणे अशी कृती आम्हाला करायची नाही. आम्ही जे काही करतो ते रोखठोक करतो, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

नात्यागोत्याचे राजकारणः वडील मुख्यमंत्री, मुलगा आदित्य कॅबिनेट मंत्री

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:uddhav thackeray reaction On maharashtra govt moves axis bank accounts and indirectly target amruta fadnavis