पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना सूचना करताना

निसर्गाला पूरक असे वैविध्यजपत आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.

जेएनयूत जाण्याच्या दीपिकाच्या कृतीला स्मृती इराणीनी दिले असे उत्तर

औरंगाबादमधील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या निलगिरी, शिवबाभूळ आदी वृक्षांमध्ये वाढ करून इतर वन्यजीवांना आवश्यक असलेल्या वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. यामध्ये विविध पक्ष्यांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारित स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावा, असेही उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना मनपा आयुक्त पांडेय, वास्तूविशारद धीरज देशमुख, दवे यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

जळगावः महाजन-दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.