पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश बारगळला

उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र आज भाजपच्या तिसऱ्या मेगाभरतीमध्ये उदयनराजे भोसले भाजप प्रवेश करणार नाहीत असे समजते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये तब्बल दीड तास वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मात्र उदयनराजे भोसले यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य न केल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश बारगळला असल्याचे समजते.  

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला एकापोठापाठ एक धक्के बसत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये त्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसंच त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक सुध्दा घेतली होती. 

वाहतूक नियमः गुजरातने ९० टक्क्यांपर्यंत कमी केली दंडाची रक्कम

दरम्यान, मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश बारगळला असल्याचे म्हटले जात आहे. आज भाजपची तिसरी मेगाभरती होणार आहे. यावेळी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी मुंबई अध्यक्षांना बोलावले