पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केवळ दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जेच माफ केली आहेत, याकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले.

सेबीच्या अतिरिक्त निधीतील ती रक्कम ताब्यात घेण्यावर सरकार ठाम

चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारला काम करताना काही मर्यादा असतात हे आम्ही समजू शकतो. पण आता उद्धव ठाकरे यांनाही समजले असेल की केवळ घोषणा करणे आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये फरक असतो. पण यापुढील काळात यु-टर्न म्हणजे उदधव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल, असाही टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मारला. 

या शहरात सर्वप्रथम पहायला मिळालं कंकणाकृती ग्रहण

गेल्या आठवड्यात संपलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणा केली. यावरून विरोधी भाजपने राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा भाजपने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरला होता. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली होती. गेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेनेनेही त्यावेळी भाजपवर हीच टीका केली होती.