पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरातील वैनगंगा नदीत बोट बुडाली; दोघांचा मृत्यू

वैणगंगा नदीत बोट उलटली

चंद्रपूरमध्ये बोट उलटून दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूरच्या वैनगंगा नदीमध्ये ही घटना घडली आहे. अंत्यविधीसाठी नदीपात्रातून बोटीने जात असताना बोट उलटली. या दुर्घटनेत ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. 

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात काढोली येथील वैनगंगा नदी घाटावर ही घटना घडली. अंत्यविधी करण्यासाठी काहीजण बोटीने वैणगंगा नदीत जात होते. त्याचवेळी अचानक बोट उलटी झाली आणि बोटीमध्ये असलेले ८ जण बुडाले. यामधील ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोन जण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर येथून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरु आहे. 

सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे योग्य उदाहरण, लेखींचे उत्तर