पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीमध्ये ग्यारापत्ती जंगल परिसरात दोन नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोलीमधील ग्यारापत्ती जंगल परिसरात सी - ६० पोलिस जवान आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

पावसामुळे मुंबईकरांची पुन्हा त्रेधातिरपीट

ग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी - ६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिस पथकानेही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार झाल्याची तसेच काही जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिस पथकाच्या हाती लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'