पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या नागपूरमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांची हकालपट्टी

नितीन गडकरी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आणि ते निवडणुकीत पराभूत होतील, असे भाकीत वर्तविणाऱ्या भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जयहरी सिंग ठाकूर आणि अभय तिडके अशी या नेत्यांची नावे आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपामुळे त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

शरद पवार राष्ट्रीय नव्हे तर बारामतीचे नेतेः प्रकाश आंबेडकर

जयहरी सिंग ठाकूर आणि अभय तिडके या दोघांमधील मोबाईलवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या संभाषणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. दोघांनीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्याकडून नितीन गडकरी पराभूत होतील, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी गडकरी यांच्याबद्दल अपशब्दही वापरले होते. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी १९७००० मतांनी विजयी झाले आहेत.

जयहरी सिंग ठाकूर हे भाजपचे नागपूर शहराचे उपाध्यक्ष होते. तर अभय तिडके हे पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य होते. भाजपचे नागपूरचे शहराध्यक्ष सुधाकर कोल्हे म्हणाले, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे नितीन गडकरी दुर्लक्ष करतात, असे या दोघांनी मोबाईलवरील संभाषणावेळी म्हटले होते. त्याचबरोबर गडकरी हे केवळ श्रीमंतासाठी काम करतात. त्यामुळे ते निवडणुकीत पराभूत होतील, अशीही चर्चा या दोघांमध्ये झाली होती. दोघांची कृती पक्षशिस्तीच्या विरोधात असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

तो विषय आता संपवायला हवाः शरद पवार

जयहरी सिंग ठाकूर यांच्याकडे पश्चिम नागपूरमधील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपदही आहे. त्या पदावरून त्यांना दूर करावे, यासाठी मी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे, असेही सुधाकर काळे यांनी सांगितले.