पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुळजापुरात विजेचा धक्का बसून कर्नाटकातील दोन भाविकांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तुळजापूर शहरातील जगदाळे पार्किंग येथे आज (रविवार) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सैन्य दलाच्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणने दिला राजीनामा

सध्या नवरात्रीनिम्मित तुळजापूरमध्ये राज्यासह देशातील विविध भागातून मोठ्याप्रमाणात भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत. कर्नाटकातूनही काही भाविक येथे आले आहेत. त्यातील काही जण आपल्या वाहनांसह येथील जगदाळे पार्किंगमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या विद्युत खांबात वीज प्रवाह उतरला होता. त्या खांबाला मुकेश भिमशा बिलकुंडे (वय १९), विनोद मारुती शेरेकर (वय १७, दोघेही रा. कवठळ, ता. बसवकल्याण, जि. बिदर, रा. कर्नाटक) या दोघांनी स्पर्श केल्यानंतर त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. 

नाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

याप्रकरणी लखन विठ्ठल शेरेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुरज हरिश्चंद्र जगदाळे (रा. जगदाळे पार्किंगचे मालक, तुळजापूर) यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'