पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धान्यांची पोती नेणारा ट्रक कारवर पलटी; दोघांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये कारला अपघात

चंद्रपूरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली. धान्यांची पोती घेऊन जाणारा ट्रक कारवर पलटी झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरातल्या नागभीड तालुक्यातील तळोधी-जनकापूर मार्गावर हा अपघात झाला अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. 

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

धान्यांची पोती घेऊन ट्रक तळोधीवरुन नागभीड येथे जात होता. त्याच दरम्यान शेजारून जाणाऱ्या कारवर ट्रक पलटी झाला. ट्रकसह धान्यांची पोती कारवर पलटी झाल्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पळसगाव-जनकापूर गावातील रस्त्याचे काम सुरु होते. रस्त्यावर असलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. 

BCCIच्या समालोचक पॅनलमधून संजय मांजरेकरांना बाहेरचा रस्ता

दरम्यान, कारमधून दोन शिक्षक प्रवास करत होते. त्याचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही शिक्षक तळोधी येथील महात्मा फुले विद्यालयात काम करत होते. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक आणि धान्यांच्या पोत्यांना बाजूला काढून त्याखाली अडकलेल्या कारला बाहेर काढले. कारमधील दोघांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे. 

मेयो रुग्णालयातून पळून गेलेले कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले