पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

अज्ञात वाहानांच्या धडकेमध्ये वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे-सोनारी रस्त्यावर ही घटना घडली आहे. 

... तर भाजपमधला 'भा' पण उरला नसता, धनंजय मुंडे यांचा घणाघात

अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत असतात. अशामध्येच रस्ता ओलांडताना त्यांचा अपघातात मृत्यू होती. आज पहाटेच्या सुमारास डुबेरे-सोनारी रस्त्यावर बिबट्याची मादी तिच्या तीन बछड्यांसह रस्ता ओलांडत होती. त्याच दरम्यान भरधाव गाडीने त्यामधील बिबट्यांच्या दोन बछड्यांना चिरडले. यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातात बिबट्याची मादी आणि एक बछडा सुदैवाने वाचला आहे. 

कोहिनूर इमारत प्रकरणः उन्मेष जोशी म्हणतात, ईडीला सहकार्य करु

याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास करुन अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

केरळमधील पूरबळींची संख्या १२१ वर