पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरापूरमध्ये वीज पडून दोन गायींचा मृत्यू

शिरापूरमध्ये वीज पडून दोन गायींचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पिकांबरोबरच पशूधन गमावण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरात विजाच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडला. त्यात सज्जन कोळेकर यांनी घराच्या परिसरात बांधून ठेवलेल्या गायींवर वीज कोसळली. यात दोन संकरित गाई मृत झाल्या. इतर सहा गायी पत्रा शेड बाहेर बांधल्याने त्या बचावल्या. 

महाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

यामुळे कोळेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकापाठोपाठ आता निसर्ग पशुधनावरही घाला घालत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले