पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; दोघांचा मृत्यू

अहमदनगर विषबाधा

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधेमध्ये दोन सख्या बहिण-भावांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना संगमनेरच्या आंबेडकरनगर येथे घडली आहे. कृष्णा दीपक सुपेकर (६ वर्ष), श्रावणी दीपक सुपेकर (९ वर्ष) अशी विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या बहिण-भावांची नाव आहेत. तर दोघींवर संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अमेरिकी आयोगाची मागणी

मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक सुपेकर यांचे कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे. शहरातील आंबेडकरनगर वसाहतीत ते राहत होते. मोलमजूरी करुन सुपेकर आणि त्यांची पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवार रात्री नऊ वाजता सुपेकर कुटुंबियांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर काहीवेळातच सर्वांना उलट्या, मळमळीचा त्रास होऊ लागला. 

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांकडून असा

सुपेकर यांच्या मुली कृष्णा, श्रावणी, वैष्णवी आणि आई भागीरथी गंगाधर सुपेकर यांना मळमळ आणि उलटयांचा त्रास होवू लागला. मात्र काही वेळाने त्यांना बरे वाटू लागले. शुक्रवारी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये उपचारा दरम्यान कृष्णा आणि श्रावणी या दोघींचा मृत्यू झाला. 

शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या बसला अपघात; ७ जण जखमी

दरम्यान, वैष्णवी आणि भागिरथी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यामुळे सुपेकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलं नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले. 

झारखंडमध्ये CRPF जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू