पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत नवजात जुळ्या मुलींचा मृत्यू; ग्रामस्थांनी रुग्णालयाला ठोकले टाळे

नवेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेची दुरवस्था झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नवेगाव आरोग्य उपकेंद्रात प्रशिक्षित नर्स नसल्याने दोन जुळ्या नवजात मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशिक्षित नर्स गैरहजर असल्याने प्रभारी नर्सने महिलेची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही नवजात मुलींचा मृत्यू झाला आहे.  या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

महाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का? - अमित शहा

अहेरी तालुक्यातील मुलचेरा मार्गावर असलेल्या नवेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षित नर्स उपलब्ध नसल्याने नवजात जुळ्या मुलींचा मृत्यू झाला . नवेगाव येथील सुमन सोनुले ही महिला प्रसुतीसाठी यारोग्य केंद्रात दाखल झाली होती. आरोग्य केंद्रावर प्रशिक्षित नर्स नव्हती. सुमन सोनुले यांना त्रास होऊ लागल्यामुळे उपस्थित असले्लया प्रभारी निर्सने त्यांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर नवजात जुळ्या मुलींचा मृत्यू झाला. 

३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न

या घटनेची माहिती मिळताच नवेगावातील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रावर धाव घेतली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत अधिकारी संबंधित नर्सवर कारवाई करत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही तोर्यत बाळांचे मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे. आरोग्य केंद्रावर तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

IND vs SA 2nd Test Live: चहापानापर्यंत भारत ४ बाद ४७३ धावा