पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तुझ्यात जीव रंगला'मधील अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा

मिलिंद दस्ताने

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमधील अभिनेते मिलिंद दस्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचा  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी  चतुर्श्रुंगी पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात फसवणुकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद दस्ताने  आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानदारांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास २५ लाखांहून अधिक किमतीचे दागिने  खरेदी केले. डोंबीवली मधील जागा विकून सर्व पैसे  व्याजासहित परत देतो असं खोटं आश्वासनही त्यांनी दिलं. या खरेदी मालाची किंमत २५ लाख ६९ हजार ९६० इतकी आहे. यात सोन्याचे दागिने, बिस्किटे, डायमंडची अंगठी आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. 

वर्षभर पैसे परत न केल्यानं त्याच्याविरोधात पु.न. गाडगीळच्या अक्षय गाडगीळ यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  मिलिंद दस्ताने यांनी पैसे नसतील तर खरेदी केलेलं सोन परत करावं अशी मागणी गाडगीळ यांनी केली. पोलीस दस्ताने यांच्या घरी पोहोचले मात्र त्यांच्या घराला कुलूप होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.