पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभा निवडणूक : सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

राज्यसभेतील सात जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होते आहे. पण या निवडणुकीत राज्य विधानसभेतील प्रत्येक पक्षाचे बलाबल विचारात घेता सातव्या जागेसाठी सध्याचे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

दोन एप्रिलला राज्यसभेतील सध्याचे सदस्य असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजिद मेनन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे अमर साबळे आणि अपक्ष खासदार संजय काकडे निवृत्त होत आहेत. 

विधानसभेतील २८८ सदस्यांचा विचार केल्यास कोणत्याही पक्षाला आपला एक उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यासाठी ३७ आमदारांची गरज आहे. भाजपकडे १०५ आमदार असून नऊ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. उर्वरित २० आमदारांपैकी किमान १५ जण हे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या बाजूने आपले मत टाकण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सात जागांपैकी सत्ताधारी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवू शकते. त्यांच्याकडे असलेल्या १६९ आमदारांच्या पाठिंब्यावर चार उमेदवार राज्यसभेत पाठविणे त्यांना शक्य आहे. भाजप आणि त्याचे अपक्ष मित्र मिळून दोन उमेदवार राज्यसभेत पाठवू शकतात. पण सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना रणनिती आखावी लागणार आहे. 

विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारावर राज्यसभेत उमेदवार पाठवले जातात. विधानसभेतील आमदार आपल्या पहिल्या पसंतीची मते उमेदवारांना देतात. त्या आधारावर जर निर्णय होऊ शकला नाही. तर उमेदवारांना देण्यात आलेली दुसऱ्या पसंतीची मते विचारात घेतली जातात. 

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांच्या आधारे सातवी जागा आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात. पण त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्ये रस्सीखेच होऊ शकते.

डोंबिवली : मारहाणीत नाही तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार निवृत्त होत आहेत. तर काँग्रेसचा एक खासदार निवृत्त होणार आहे. असे असले तरी काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण विधानसभेतील पक्षीय बलाचा विचार केल्यास शिवसेनाही या जागेवर आपला दावा सांगू शकते.