पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...नाहीतर इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू; तृप्ती देसाईंचा इशारा

तृप्ती देसाई

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. येत्या चार दिवसांमध्ये इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इसारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. 

राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री

इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. अहमदनगर येथे येऊन तृप्ती देसाईंनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांना इंदोरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. येत्या चार दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. 

'पुरोगामी, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव'

दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी मंगळवारी आठ दिवसानंतर माफी मागितली आहे. इंदोरीकर महाराज यांनी महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि माता-भगिनींना या सर्वांना उद्देशून हा लेखी माफीनामा जारी केला आहे. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे इंदोरीकर महाराजांनी या लेखी पत्राद्वारे सांगितले आहे. 

धक्कादायक! जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परिक्षा