पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरमध्ये वडवळ पुलावरुन ट्रक कोसळला; रेल्वेसेवा विस्कळीत

सोलापूर अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घडली आहे. या महामार्गावरील वडवळ पुलावरुन ट्रक कोसळून रेल्वे रुळावर पडला. या ट्रकमधून डांबराचे ड्रम नेण्यात येत होते. हे ड्रम रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली आहे.

पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

हा ट्रक मोहोळ मार्गे सोलापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, वडवळ पुलावरील कठडे तोडून ट्रक २० फूट खाली कोसळला. या पुलाच्या खालून रेल्वे मार्ग आहे. ट्रक आणि त्यामध्ये असणारे डांबराचे ड्रम रेल्वे रुळावर पडल्यामुळे  पुणे - सोलापूर  रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी रेल्वे मार्गावरुन गाडी जात नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

भारताचा प्रत्येक नागरिक फिट रहायला हवा: मोदी

रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबर ट्रकमधून नेण्यात येत होते. या घटनेमध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोपर्यंत ट्रक आणि डांबराचे ड्रम रेल्वे रुळावरुन हटवण्यात येत नाही तोपर्यंत रेल्वे वाहतुक सुरु होणार नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ट्रक आणि डांबराचे ड्रम हटवण्याचे काम सुरु आहे.  

गणपतीच्या आगमनासोबत पावसाच्याही