पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नगरजवळ एसटी-ट्रकची समोरासमोर धडक, ४ ठार

उत्तर प्रदेश अपघात

अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगावनजीकच्या रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर २० तर जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. 

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला मुदतवाढ, प्रवाशांना दिलासा

जामखेड-मुंबई ही बस नगरहून पुण्याकडे निघाली होती. बस पुलावरून जात असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकची एसटीला समोरासमोर धडक बसली. या अपघातात पुलाचा कठडा तुटला. अपघातग्रस्त वाहनांचा धक्का लागल्याने अन्य दुचाकी वाहनेही पुलाखाली पडल्या. स्थानिकांनी अपघातस्थळी त्वरीत धाव घेऊन मदत केली. बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

दिल्लीतून उगम पावलेलं ग्रहण कधी सुटणार?, धनंजय मुंडेंचा खोचक सवाल

हा अपघात झाल्यानंतर बस पुलावरून पडेल की काय या भीतीने अनेक प्रवाशांनी उड्या टाकून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले.