पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात ट्रक-बसचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू २० जखमी

सातारा अपघात

साताऱ्यामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि बसचा अपघात होऊन ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० जण जखमी झाले आहेत.  

मेगा गळतीचे आत्मचिंतन करा! फडणवीसांचा विरोधकांना टोला

साताऱ्यातील डी-मार्टसमोर ही अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले सर्व प्रवासी कर्नाटकातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

पाणी टंचाईमुळे लातूरमध्ये यंदा गणेश विसर्जन नाही