पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरजवळ सुटकेस घेऊन जाणारा ट्रक पेटला

सोलापूरजवळ सुटकेस घेऊन जाणारा ट्रक पेटला

मोहोळ तालुक्यातील (जि. सोलापूर) कुरुल विजयपूर महामार्गावर सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. या आगीत ट्रक जळून भस्मसात झाला. आग विझविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले होते. आगीत जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. 

माफी मागितल्यानंतर वारिस पठाण म्हणाले, जय हिंद!

अधिक माहिती अशी, नाशिकहून चेन्नईकडे कार्गो टेलर (एचआर झेड ८९३१) ट्रॅव्हलर व सुटकेस घेऊन जात होता. मोहोळ-विजयपूर मार्गावरील कुरुल हद्दीत हा कार्गो ट्रक आल्यानंतर अचानक त्याला आग लागली. मोठ्याप्रमाणात आग लागल्याने धुराचे लोट निघत होते. आगीची माहिती मिळताच कुरुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरीत अग्निशामक दलाला याची माहिती दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीमुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. 

गुजरातमध्ये जे झालं, ते वारिस पठाण यांनी विसरु नयेः भाजप नेता