पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनिषा पाटणकर-म्हैसकर

राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. यामध्ये नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक जयश्री भोज यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त महापालिका आयुक्त याठिकाणी बदली करण्यात आली असून पुण्यातील राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचलाक सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडे पुणे पुशसंवर्धन आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

निर्भयाच्या दोषींना वेगवेगळी फाशी देण्याबाबत उद्या

अधिकाऱ्याचे सध्याचे ठिकाण (बदलीचे ठिकाण)

मनीषा पाटणकर-म्हैसकर प्रधान सचिव नगर विकास विभाग  (प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी)

जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक (अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई)

एम डी पाठक प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा (प्रधान सचिव नगर विकास-२ )

डी एम मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी (जिल्हाधिकारी, परभणी) 

सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे (आयुक्त पशुसंवर्धन, पुणे)

सी.के. डांगे सचिव सामान्य प्रशासन विभाग (महापालिका आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका)

एम देवेन्‍द्र सिंह महापालिका आयुक्त लातूर महानगरपालिका, लातूर (जिल्हाधिकारी, यवतमाळ)