पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे, अनिल देशमुखांचा आरोप

गृहमंत्री अनिल देशमुख

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी केली. कोणाला तरी वाचविण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींवर सतत लक्ष ठेवलं जातंय, का माहितीये?

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर टीका केली होती. त्याचबरोबर विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हा तपास दिला जावा, अशी मागणी केली होती. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत मंत्रालयात अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला होता. त्यातच शुक्रवारी उशिरा हा तपास एनआयएकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली.

अनिल देशमुख म्हणाले, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास परस्पर एनआयएकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य आहे. या प्रकरणी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलू. कोणाला तरी वाचविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात निर्दोष व्यक्तींवर कारवाई होऊ नये, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल चोरट्याला मिळाली मोठी शिक्षा, बोटाचे करावे लागले ऑपरेशन!

एसआयटी स्थापन केली जावी, अशी मागणी शरद पवार यांच्यासोबतच इतरही काही संघटनांनी केली होती. राज्य सरकार या प्रकरणी एसआयटी स्थापन करेल, हा विचार करूनचे घाईगडबडीत हे प्रकरण एनआयएकडे देण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.