अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे आनंदवाडी येथे पुण्यावरुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी
गुरुवारी दुपारनंतर अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास ७ ते ८ तास झालेल्या या पावसामुळे संगमनेर येथील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात महामार्गावर पाणी साचले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पाणी पातळी थोडी कमी झाल्यानंतर याठिकाणावरुन वाहतूक सुरु झाली आहे. मात्र धिम्या गतीने वाहतूक सुरु असल्याने घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आठवले म्हणतात, रिपाइंला हवं १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद
वाहतूक कोंडीमुळे दिवाळीनिमित्त नाशिकच्या दिशेने गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातली अनेक भागामध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा धरणातून ३ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.