पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा २१५ वर, कोल्हापूर-नाशिकमध्ये नवे रुग्ण

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळपर्यंत राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २१५ वर पोहोचली. 

आज कोरोना बाधित १२ नवे रुग्ण समोर आले आहेत. यात पुण्यात ५, मुंबईत ३, नागपूरमध्ये २ आणि कोल्हापूर- नाशिकमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आहेत.  तर राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा ७ आहे. 

आशादायी ! राज्यातील ३४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत

कोरोनाचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्ण यातून बरे होऊन घरी परतत आहेत. रविवारी पुण्यातील पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेलं  पहिलं जोडपं देखील ठणठणीत बरं होऊन गेल्याच आठवड्यात घरी परतलं.  

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या प्रदूषणात ८०% टक्के घट

तर देशात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत.