संस्कृत समजून घेतल्याशिवाय भारताला समजून घेणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या भाषा, ज्यामध्ये आदिवासी भाषांचाही समावेश आहे. त्यामध्ये किमान ३० टक्के संस्कृत शब्दांचा समावेश आहे, असेही त्यांनी म्हटले.
ते म्हणाले की, देशाची परंपरा जाणून घेण्यासाठी संस्कृत जाणणे महत्वाचे आहे. पण आपल्याला संस्कृत शिकायला मिळाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही खेद व्यक्त केला होता.
संघ 'डिजिटल'!, मोहन भागवतांसह अनेक नेते टि्वटरवर
आपल्या देशातील कोणत्याही भागातील कोणतीही भाषा अशी नाही, जी ३ ते ४ महिन्यांत शिकता येत नाही. जर आपण पहिल्यांदा एखादी भाषा ऐकत असू आणि ती व्यक्ती हळू बोलत असेल तर किमान आपण त्याची भावना समजू शकतो. याचे कारण आहे संस्कृत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रभक्तीचा दिखावा नकोः मोहन भागवत
भारतातील प्रत्येक भाषेत, इतकेच काय आदिवासी भागातील भाषांमध्येही किमान ३० टक्के संस्कृत शब्द आहे. संस्कृत ज्ञानाची भाषा आहे आणि खगोल विज्ञान, कृषी आणि आयुर्वेदमधील सर्व ज्ञान संस्कृतमध्ये मिळवता येऊ शकते. भारतातील पूर्व-आधुनिक इतिहासातील साधनेही केवळ संस्कृतमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच म्हटले होते, असे सांगत प्रत्येकाला शिकावी वाटावी, अशा पद्धतीने संस्कृतचे ज्ञान दिले जावे, असे ते म्हणाले.