पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रत्नागिरी : तिवरे धरण फुटले, ११ जणांचा बळी; १३ बेपत्ता

घटनास्थळाचे छायाचित्र

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले तिवरे धरणाला मंगळवारी रात्री मोठे भगदाड पडून ते फुटले. यामध्ये ११ जण मृत पावल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोकणात सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे धरण भरले होते. त्यातच धरण फुटल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला. धरणाजवळ असलेल्या वाड्या, वस्त्यांतील घरांना याचा फटका बसला आहे. धरणाजवळ असलेली १२ घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे एएनआयने म्हटले आहे. एकूण १३ जण सध्या बेपत्ता आहेत. धरण फुटल्यामुळे एकूण ७ गावांना फटका बसला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

घटनास्थळी मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार हे धरण धोकादायक झाले होते. धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. या धरणातील पाण्याचा सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापर होत होता. 

धरण फुटल्यामुळे आजूबाजूच्या वाड्या, वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले. कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरात पाऊस सुरू आहे. पावसामुळे मंगळवारीच हे धरण भरले होते. पण पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या धरणाच्या भिंतीला तडे गेलेले असल्यामुळे त्याला मोठे भगदाड पडले आणि धरणातील सर्व पाणी वाहून गेले. धरणातील सर्व पाणी सध्या वाहून गेले असल्याचे स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले.

२००० मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते आणि त्यामध्ये पाणी साठविण्या सुरुवात झाली होती.