पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टिकटॉक कंपनीने (बाईटडान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल

टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृह विभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोविड १९ संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे. 
या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पाऊले उचलल्याचे निखील गांधी यांनी म्हटले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून १ कोटीची मदत
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्यावतीने विजय कांबळे, जनरल मॅनेजर, मुंबई यांनी सोमवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला.

यूपीमध्ये दोन साधूंची हत्या करणाऱ्याला अटक, हत्येचे कारण उघड

कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आबालवृद्ध सहभागी होत आहेत. आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभागी होत आपले योगदान दिले असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी दिला आहे.

आतापर्यंत २८५ कोटींची मदत जमा
या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
---------------
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.